आपण लिहिले आहे त्याप्रमाणे पाकिस्तान अमेरिकेला ब्लॅकमेल करण्याच्या परिस्थितीत आहे असे वाटत नाही. त्यांच्या अण्वस्त्रसाठ्याच्या भोवती कधीचाच अमेरिकन सैनिकांचा खडा पहारा आहे असे वाचले होते. संदर्भ आता आठवत नाही. अमेरिका नेहेमी दहा वर्षे पुढचा विचार करते. उलट अमेरिकेने पाकिस्तानची इच्छा नसताना बळजबरीने तालिबान्यांशी लढायला लावले आहे. तालिबान्यांचा खातमा झाला तरी पाकिस्तान मधून अमेरिका कधीच बाहेर पडणार नाही, कारण त्यांना रशिया, चीन व भारत यांच्यावर वचक ठेवायचा आहे.