sahaj-suchala-mhanun येथे हे वाचायला मिळाले:

प्रिय सखी,

आज आषाढी एकादशी, पाऊस कोसळतोय. जनरली आषाढी एकादशीला पाऊस पडतोच ना ग!
तुला आठवतं आपण तिघी एक वर्ष आषाढी एकादशीलाच पावसात अडकलो होतो? गाड्या ठप्प झालेल्या!
बहुतेक २००० साल असणार.

हो नक्कीच २००० च कारण माझा साखरपुडा नुकताच झालेला. तुम्ही मला हैराण केल होतत आता भेटा आणि म्हणा "बरसात मे हमसे मिले तुम सजन तुमसे मिले हम...."
सगळीच गम्मत नुसती. त्याची नेमकी गाडी चुकली होती. मोबाईल नावाची चीज तेव्हा चैन होती म्हणजे ती आपल्याकडे नसायचीच.

तरी नशीब! आपली ट्रेन भायखळा स्टेशन वर दि एन्ड झाली ते. दि एन्ड तुझा शब्द ...
पुढे वाचा. : प्रिय सखी