कविता आवडली. मात्र ती उलगडत जाणारी असल्यामुळे तिला गझल म्हणता येणार नाही. कटककर म्हणतात त्याप्रमाणे चवथा शेर तिसऱ्यावर अवलंबून आहेच; शेवटचाही आधीच्या संपूर्ण कवितेच्या संदर्भाविना स्वतंत्रपणे उभा राहू शकत नाही - पाऊस आल्यावर कवी का व कुठे हरवला, खिडकीशी का थिजला हे काहीच केवळ ती द्विपदी वाचून स्पष्ट होणार नाही.