हे खरे आहे हे मान्य!
पण ते प्रश्न विचारणारे मनोगतावर आलेच नाहीत. त्यामुळे इथे विनोदबुद्धी दिसतच नाही. इथे दिसते वैयक्तिक अन हिणकस टीका!
कुणाची ढेरी वाढलीय, कुणाला मद्य फार लागते, कुणाची बायको त्याला मारते, कुणी 'दिसली पोरगी की वेडा होतो', वगैरेच्या पुढे ती विनोदबुद्धी जात नाही. त्यामुळेच आपणही बघत असाल की हसणारे हल्ली बरेच कमी झालेत.
हल्ली विडंबकांना विडंबकच प्रतिसाद देतात त्याचेही कारण हेच असावे.
( आता हे अस्मादिकांचे वाक्य वाचून काही अ-विडंबक विडंबनांना प्रतिसाद द्यायला धावतील हे चित्र दिसत आहे. )