मनोगतींस,
हे सदर सूरू होताच 'अमावस्या' ह्या विषयावर जुन्या काळात जास्त समज / गैर-समज पसरवलेले वा पसरले गेले आहेत व ते पुर्व परंपरागत रितीने आपल्या काळा पर्यंत पोहचले आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल. सदर चर्चा सूरू करतांना सहज एक मनांत विचार आला व तो मनोगतींपुढे आणला. सर्व प्रतिसादांत 'अमावस्या' हे एक सूत्र कायम राहीलेले आहे.
काही संदर्भ वाचुनही त्यातून ह्या विषयावर नेमकी शास्त्रोक्त माहीती मीळाली नाही हे नमूद करण्यास खेद वाटतो. परंतू मानवाचा स्वभावच असा असतो की जी माहीती त्याला प्राप्त्य होत नाही, त्या माहीतीचे औत्सुक्य वाढत जाते. ह्या औत्सुक्याचा शेवट ज्ञानप्राप्ती ने होत असावा.
अमावस्या ह्या विषयावर गेल्या २ दिवसांत जी माहीती गोळा करू शकलो त्याचा थोडक्यात परामर्श असा -
"एखाद्या विशीष्ठ नीमीत्ताने घातल्या गेलेल्या पुजा, लग्न-मौंज वा शुभ प्रसंगांसाठी अमावस्येला मुहूर्त मिळत नाहीत. अमावस्येचा मानवी जीवनाशी ज्योतिषशास्त्रद्रुष्ट्या संबंध आहे. जे शुभाशूभ व परलोक शास्त्र मानतात त्यांचा असा समज असतो की, या दिवशी पिशच्च योनीतील जीवत्मे विशेष स्वैर बनतात. गंभीर आजारी असलेल्या बहुसंख्य रुग्णांचे निधन अमावास्या व करिदिनाच्या सुमारास होते असा समज आहे." त्या पुस्तकात असेही सांगीतले आहे की स्मशान नाक्यावरील आकडेवारी ह्याच्या पडताळ्यासाठी तपासली गेली असता, ती बाब खरी ठरलेली आहे. लांबचे, दुचाकी वरील तसेच रात्रीचे प्रवास टाळावे असेंही त्या पुस्तकात म्हटले आहे.
वाचकांनी कृपया लक्षात घ्या - ही माझी मते नसून मी घेतलेला पुस्तकातील परामर्श आहे. मी हे टंकांतर करीत असतांना - करू की नको ह्या संभ्रमात होतो. ह्या विषयी रान उठण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असतांनाही मी हे येथे देत आहे कारण जी माहीती आपल्याला सापडलेली असते ती मनोगतवर देणे हेच खरे तर आपले सर्वांचेच ईप्सीत आहे. अजुन माहीती हाती पडल्यास ती वेळोवेळी येथे देत राहीनच.
माधव कुळकर्णी.