GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
सदन याचा जन्म पूर्वदुष्कृतामुळे कसाई कुलात झाला तरी पूर्वजन्मी घडलेल्या सत्कर्माचरणाच्या संस्कारांमुळे, रोज त्याच्या घरात चालत असलेले पशुवधाचे घोर कृत्य त्याला पहावत नसे. नाईलाजास्तव बापाच्या आज्ञेने त्याला पशुवधाच्या वेळी जवळ उभे रहाण्याची वेळ येई. तरी त्या संकटसमयी त्याच्या अंगाला थरकाप सुटे. ती वेळ म्हणजे महान् संकट वाटून त्याला रडू येई. ‘देवा! या नरकातून तू माझी सुटका केव्हा करणार?’ असे तो वरचेवर म्हणे. बाप सदनास जुलुमाने दुकानात मांस विकण्यास बसवी. परंतु त्याचे त्याकडे लक्ष नसल्याने तो हरिनामात रंगून जाई. ते पाहून, आपल्या धंद्याला ...
पुढे वाचा. : १७. संत सदन कसाई