माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
२००६ मध्ये अधिवेशनाची स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवताना किंवा अगदी ह्या ब्लॉगचे नामकरण करताना कुणी म्हटले असते की बाई तू आताच काही महिन्यांमध्ये ह्या नावाचा इतिहास ज्या व्यक्तीशी संबंधीत सांगतेस ती अशी तुझ्याशी समोरासमोर ऊभी राहुन गप्पा करील, तर मी ती गोष्ट उडवून लावली असती. पण १ जुलै माझ्या आतापासुन कायम स्मरणात राहिल हे मात्र खरे.