धन्यवाद! आपण दोघांनीही अत्यंत छान विचार मांडलेत.
श्री. अलोक जोशीः आपले खालील वाक्य मला तरी फार महत्त्वाचे वाटले
माघचा पुढे गेला तरी ती येणार्यास बघता यावी.
श्री. कुशाग्रः आपले हे मत!
त्यामुळे जे गद्य नाही ते काव्य अथवा कविता असे समजायला हरकत नाही.
मला मनात असे आले की ते काव्य' ( म्हणजे प्रतिभेने युक्त / विद्वत्तायुक्त / आशयभारी ) म्हंटले जावे पण कविता म्हंटले जाऊ नये.
श्री शुद्ध मराठीः आपले हे मत!
सामान्यतः कवितेत खालील बाबी दोष म्हणून समजल्या जातात. र्हस्वदीर्घदोष, वचनदोष,
लिंगदोष, अपसंधी, अनियमित संधी, विसंधी, अप्रयुक्त समास, निष्कारण अधिक
शब्द, निरर्थक पादपूरणार्थी शब्द, क्लिष्टत्व, उलटा शब्दानुक्रम, अयोग्य
वाक्प्रचार, यतिभंग, यमकदोष, छंदोदोष, प्रयोगशैथिल्य, अप्रयुक्त
विभक्तिरूप, आणि.... अप्रयुक्त क्रियापदरूप.
पूर्णपणे पटले. माझ्यामते आपल्या या अटी 'कविता' या सदरास लावल्या जाव्यात. किंवा त्या सदराला 'कविता' असे नाव देण्याऐवजी 'प्रतिभा' असे नाव दिले
जावे. कारण त्यात प्रतिभा निश्चीतच असते, कविता मात्र असतेच असे नाही.
सर्वांचा आभारी आहे.