टीकाकार ??? ः)

स्वघोषित  टिकाकार बरेच असतात .... असो ...

राहिला मुद्दा, एकाच गज़लेत तोच तोच काफ़िया परत परत वापरण्याचा.
असे चालू (पळू) शकते, त्यावर काही आक्षेप नाही.

किंबहुना काही वेळा एखाद्या गज़लेत एकच काफ़ियाचा वेगवेगळ्या खयालांबरोबर अनेकदा वापर  करणेच खरे तर अवघड असते .

कारण तो शेर त्या  विशिष्ठ काफियाशी निगडीत असल्याने, आपण त्या खयालाच्या  वैचारिक कैदेतून लगेच बाहेर पडू शकत नाही.
परिणामी त्याच विशिष्ठ काफ़ियावर त्याच गजलेत शेर रचताना कल्पना शक्तीला  कुलूप लागल्या सारखी गत होते.

खरे तर एकाच काफ़ियावर आधारलेले अनेक शेर असणारी गज़ल मला लिहायची आहे ...पाहू केव्हा जमतंय ?

- यादगार