नमस्कार!
रोजच्या बोलण्यात आपण भगवान/वती, श्रीमान/मती, धीमान/मती असे शब्द वापरत असतो. या शब्दांची अगदी ढोबळमानाने (यात संधी/समासाचे नियम अजिबात लक्षात घेतलेले नाहीत) फोड केली असता 'भगवान = भग + वान' किंवा 'धीमान = धी + मान' अशी होईल. म्हणजेच पहिला शब्द हा एखादा गुण अथवा एखाद्या वस्तूचे नाव दर्शवतो. तर त्या शब्दाला 'वान/मान' हे प्रत्यय जोडून 'ज्याच्याजवळ ती वस्तू किंवा गुण आहे असा' या अर्थाचे विशेषण तयार होते.
बऱ्याच दिवसांपासून एक शंका माझ्या डोक्यात आहे ती म्हणजे '_वान' अथवा '_मान' या प्रत्ययांचा प्रयोग करण्याचा काही नियम असावा का? म्हणजे 'भग' या शब्दाला 'वान' तसेच 'धी' करता 'मान' हेच प्रत्यय का लागतात? 'भगमान'/'धीवान' असे शब्द होऊ शकत नाहीत का?
जाणकारांनी या विषयावर प्रकाश पाडावा ही विनंती.
धन्यवाद.