"सकाळी उठोनी, तोंड धुवोनी, वाचित बसती शहाणी बाळे ती" च्या चालीवर म्हणावेसे वाटते :
"सकाळी बसोनी, 'साहेबा' स्मरोनी, स्तुतिपाठ करती मिंधे चारण ते
शरदाचे चांदणे दिवसा पाहोनी प्रकाशा वानती भाट अकारण ते
घोटाळे कितीही येवो उघडकीला, जागावे मिठाला नोकरांनी
दाबावी बातमी हितसंबंधांची, काका-पुतण्यांची, लेकीचीही
लवासा-बिवासा बरळोत कुणीही काही-बाही
संबंध आपुला अशा बातमीशी काही नाही
पक्षाचा प्रचार करू उजागर संपादकियात प्रात:काली
निर्भीड पत्रकारा करावी लागेल खुर्ची खाली
कुवळेकरांचा लागला न पाड तिथे तुला-मला कोण वाली..."