नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:

गोमुखची खडतर पायपीट संपवून गंगोत्री गाठली तेव्हा म्हटलं चला खरोखरच गंगेत घोडं न्हालं. तशी वाटेत गोमुखला जाताना अनेक खेचरं अक्षरशः गंगेत न्हात होती. तर वर बसलेले खेचरस्वार प्राण मुठीत घेऊन एक एक पल्ला पार करत होते. पायी चालणारे एकमेकाना ' जय भोले - जय भोले ' म्हणून उत्साह वाढवत होते पण हे खेचरस्वार काहीच बोलत नव्हते, समोर काही अडचण आली तर ती खेचरं मागे परतून पळ काढायला बघत. त्यात पुन्हा आपण काही बोललो आणि त्या खेचरांचा गैरसमज झाला तर, नको ते बोलणं नको, म्हणून खेचरस्वार गप्प.

पुढे वाचा. : गढवाली पाहुणचार