मेघना यांनी म्हटल्याप्रमाणे ऋचा आणि शुद्ध मराठी यांच्या प्रतिसादात आहे. आपल्यासाठी पुन्हा थोड्या वेगळ्या शब्दांत आणि आपल्या प्रश्नाला साजेसे असे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे...
आपला प्रश्न,
'_वान' अथवा '_मान' या प्रत्ययांचा प्रयोग करण्याचा काही नियम असावा का? म्हणजे 'भग' या शब्दाला 'वान' तसेच 'धी' करता 'मान' हेच प्रत्यय का लागतात? 'भगमान'/'धीवान' असे शब्द होऊ शकत नाहीत का?
नियम आहेच मात्र तो 'वत' आणि 'मत' या प्रत्ययांना आहे आणि अनुक्रमे 'वान' आणि 'मान' ही त्याची प्रथमा एकवचनाची रुपे आहेत (वान आणि मान हे संधी किंवा समास अजिबात नाहीत, त्यामुळे संधी आणि समासाच्या नियमांकडे लक्ष देऊच नका. )
तसेच इथे असे रुप होताना 'भग' असा शब्द नसून 'भगवत' असा शब्द आहे म्हणून 'भगवान' हे रूप झाले आहे, तसाच 'धीमत' हा शब्द आहे. हे शब्द 'त' कारान्त असल्यामुळे त्याची रूपे किंवा ते भगवान-भगवन्तौ-भगवन्तः असेच चालवावेत असा नियम आहे. त्यामुळे 'भगमत' किंवा 'धीवत' असा शब्द असेल तर त्याचे रूप अनुक्रमे 'भगमान' आणि 'धीवान' असे होईल. असे शब्द आहेत की नाहीत माहित नाही.
आता नुसता 'भग' किंवा 'धी' असे अनुक्रमे 'अ' कारान्त आणि 'ई' कारान्त शब्द घेतले तर त्याची रुपे वेगळी होतील. (उदा. भगः-भगौ-भगाः आणि धीः-धियौ-धियः असे...)
मी दिलेली माहिती मला असलेल्या थोड्याशा संस्कृतच्या ज्ञानावर आधारित आहे. जाणकार अधिक माहिती देतीलच. शिवाय माझा हा प्रतिसाद वाचून ह्या शब्दांच्या मराठीतील वापरासाठीच्या नियमांसाठी वरील शुद्ध मराठी आणि ऋचा यांचे प्रतिसाद वाचलेत तर महितीत नक्कीच चांगली भर पडेल असा विश्वास वाटतो.
(चू. भू. द्या.)
धन्यवाद !!!
ता. क. :
वर आलेले वान, मान, भगवत, भगवान, धीमत, धीमान यासारखे शब्द पाय मोडून (शब्दांचे ) वाचावेत. मला अजून पाय मोडायचे कसे हे माहित नाही. मनोगताच्या जाणकार पैलवानांनी तेही शिकवावे ही विनंती.