निखिल आणि मेघना,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. काल ऑफिसमधून निघायच्या घाईत ऋचा आणि शुद्ध मराठी यांचे प्रतिसाद देखिल धावतच वाचलेत आणि त्यातच नेमके मुद्दे नजरेतून सुटले.
त्या प्रतिसादांतून माझ्या प्रश्नाशी संदर्भ असलेले २ मुद्दे मला समजलेत...
अ) म, अ किंवा आ शेवटी किंवा उपांती असल्यास मत चे वत होते. कचटतप या वर्गातल्या पहिल्या चार अक्षऱांपुढे मत आल्यास त्याचे वत होते. असे असले तरी, या नियमाला अनेक अपवाद आहेत. शुद्ध मराठी यांनी दिलेली ही माहिती संस्कृतातील शब्दरचनेसाठी उपयुक्त आहे. मात्र मराठीत अशा प्रकारचा नियम लागू होत नाही. मराठीत यासंदर्भातील संकेत हे पूर्णपणे यादृच्छिक आहेत.
म्हणजे, शु. म. यांनी दिलेल्या नियमाला संस्कृतात तर अनेक अपवाद आहेतच आणि ऋचा यांनी म्हटल्यानुसार मराठीत देखिल हा नियम लागू असेलच असे नाही.
ब) या संदर्भात पाणिनीची तीन सूत्रे आहेत. १. तदास्यास्ती अस्मिन् इति मतुप् । रसादिभ्यश्च ।.. (पाणिनी ५. २. ९४, ९५)मत हा प्रत्यय (जे आहे ते ह्यांत आहे) स्वामित्व किंवा (रसादिभ्यश्च)गुणदर्शक आहे. २. मादुपधायाश्च मतोर्वोऽयवादिभ्यः । (पाणिनी ८. २. ९) मत हे उपधायाचे(उपांत्य वर्णाला लागून) नामाचे विशेषण करते. मतोर्वोः (म, अ, आणि आ) शेवटी असले की मत चे वत (वादिभ्यः) होते.
यातील पहिल्या सूत्रातून मत् हे प्रत्यय केव्हा वापरावे याचं बऱ्यापैकी स्पष्टीकरण होतंय, तर दुसऱ्या सूत्राचा भाग वरच्या 'अ' मुद्द्यामधल्या नियमात आहे. (चर्चा सुरू करताना असेच नियम अपेक्षित होते.)
यावरून, 'म, अ किंवा आ शेवटी किंवा उपांती असल्यास मत चे वत होते. कचटतप या वर्गातल्या पहिल्या चार अक्षऱांपुढे मत आल्यास त्याचे वत होते आणि यानुसार नसलेले सगळे शब्द (_वान/_मान) अपवाद आहेत' असा अर्थ काढता येईल का? की या २ नियमांनंतर आणखीही काही नियम आहेत?
अवांतर : निखिल, एखाद्या अक्षराचा पाय मोडून लिहायचे असल्यास त्या अक्षराच्या चिन्हाची कळ दाबल्यानंतर .h(डॉट एच्) या कळा(?) दाबाव्यात. उदा. त् = t.h