राखी सावंतचे वागणे ती ज्या झगमगाटी दुनियेत वावरते त्या दुनियेच्या संस्कृतीप्रमाणेच आहे. विरोधाभास हा त्या संस्कृतीचा  आत्मा आहे. स्त्रियांचे उदात्त चित्रण करणारे सिनेमे काढणाऱ्या या दुनियेत पुरुषांचे कमालीचे वर्चस्व आहे. अशा दुनियेत राखी सावंत अपवाद असावी अशी अपेक्षा करण्यांत अर्थ नाही.