उगाच राखी सावंत च्या नावाने खडे फोडून काय उपयोग?
#१. तो कार्यक्रम ज्या वाहिनी वर येतो ती वाहिनी नुकतीच सुरू झाली आहे. त्याना कोणत्या ना कोणत्या मार्गे प्रसिद्धी हवीच होती. राखी सावंत हे केवळ एक माध्यम आहे. जर राखी नसती तर त्यांनि दूसरी कोणी निवडली असती.
#२. प्रसिद्धी लोलुप लोकांची काही कमी नाही. आणि प्रसिध्ही ही प्रसिध्ही असते भले कोणत्या ही मार्गे मिळो.
#३. कोणत्या वाहीनी वर काय दाखवायचे याचे निर्णय तिथला अधिकारी वर्ग घेतो, त्यामुळे निव्वळ पोटभरू हेतुने त्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या लोकांना नावे ठेवून काही उपयोग नाही.
जरा डोळे उघडे ठेवून पाहिले आणि विचार केला तर वड्याचे तेल वांग्यावर निघणार नाही. 