केदार,
मीदेखील पक्षीतज्ञ नाहीये (पक्षीतज्ज्ञदेखील नाही). पण अनेकदा असं वाटतं की आपण माणूस आणि इतर प्राणी (ह्यांत पक्षीही आले) ह्यांची तुलना करून चूक करतो. अनेकदा इतर पक्ष्याप्राण्यांची घडणच अशी झालेली असते की त्यांना अशा गोष्टींचा त्रास होत नाही. (ह्याला बहुधा अनुकूलन म्हणतात.) उदाहरणार्थ सर्व पक्षी-प्राणी कच्चं अन्न खातात आणि बहुतांश माणसांना कच्चं अन्न पचत नाही. पाण्यात भिजूनही थंडी न वाजणे / वाजलेल्या थंडीने विचलित न होणे हा मला तरी अनुकूलनाचा भाग वाटतो. चू. भू. द्या घ्या.