"पावसाची धार का भिजवून हल्ली जात नाही?
एव्हढा दुष्काळ पडला, थेंबही नयनात नाही

शेवटी आच्छादलो होतो कधी त्या कुंतलांनी ?
शेवटी भिजलो कधी तेही मला लक्षात नाही

तापल्या मातीस वाटे, लांबला पाऊस यंदा
पावसाला काळजी, अद्याप ती सुस्नात नाही

आजही घडतात भेटी, आजही फुलतात गात्रे
भाग सवयीचाच जादा, अंतरी बरसात नाही"             ... व्वा, गझल मस्तच !