फक्त कावळ्यांना भिजायला आवडते. ते चक्क पागोळ्याखाली बसून आंघोळ करतात. एखाद्या भिजून चिंब झालेल्या माणसाला म्हणूनच 'भिजलेला कावळा' म्हणतात. बाकीचे पक्षी भिजायला घाबरतात. रबरी नळीने पाणी उडवले की बुलबुल, कोकिळा यांसारखे काही पक्षी अंगावर शितोडे घ्यायला पुढे सरसावतात, पण कुणीही स्वतःला कावळ्यासारखे भिजवून घेत नाही.  पाऊस पडायला लागला की खार, मांजर, चिमणी वगैरे आडोशाला आसरा घेतात.