माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

हा तर काय सांगत होते पहिल्या दिवसाची सुरूवात तर उशीरा पोहोचल्यामुळे पेढाच जास्त गोड मानुन केली पण समोरुन येणारी अमेरिकेत वाढणार्‍या छोट्या पिढीची मिरवणुक पाहुन मात्र बाकीच्या चिंता विसरले. ढोल, ताशे आणि अगदी पारंपारिक पद्धतीनं सजलेले बाळगोपाळ अगदी दृष्ट लागण्यासारखे गोड दिसत होते आणि त्यांनी एक छोटं नृत्य सादर केलं त्याने तर अजुनच बहार आली.
आता मला माझी मैत्रीण सुजाता आणि तिचं कुटुंबही भेटलं होतं. त्यामुळे आरुषला हक्काचा एंटरटेनर मिळाला होता. मात्र स्वारी अजुन म्हणावी तशी रमली नव्हती आणि मलाही पैठणीमुळे उगाच दबल्यासारखं होत होतं; ...
पुढे वाचा. : सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)