prajkta येथे हे वाचायला मिळाले:
अगर फिरदौस...बररुए...हमी अस्त, जमी अस्त, जमी अस्त....अशी, स्वर्गीय अनुभूती देणारी अनेक ठिकाणे या भूतलावर आहेत. केरळचा विचार केल्यास हे राज्य पृथ्वीवरील स्वर्गच आहे. म्हणूनच केरळला "गॉडस् ओन कंट्री' म्हटले जाते. मोसमी पावसाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळवर निसर्गसौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. समुद्रावरून साऱ्या किनारपट्टीला कवेत घेणारा भन्नाट वारा. माडांच्या सळसळणाऱ्या आवाजाने भरून राहिलेला परिसर. बॅकवॉटरच्या पाण्याशी सलगी करताना सूर्यकिरणांनी पाण्यावर बनविलेल्या चांदण्यांचे दागिने मिरवत प्रवास करणाऱ्या छोट्या-छोट्या नौका. जैवविविधतेने ...