माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी उठलो तेंव्हा ७ वाजून गेले होते आणि चहा-नाश्ता तयार होता. नाश्ता म्हणजे गरमा-गरम कांदेपोहे. झट-झट आवरून घेतले आणि श्रीवर्धन किल्ला बघायला निघालो. तिकडे दूसरीकड़े अभि, संजू आणि अमेय काल बिघडलेल्या बुलेटला रिपेअर करायला निघून गेले. त्यांना २-३ तास तरी नक्की लागणार ह्या अंदाजाने आम्ही गडफेरी पूर्ण करायचे ठरवले. देवळासमोर आहे तो श्रीवर्धन किल्ला. तर मागच्या बाजूला आहे तो मनोरंजन किल्ला. निघालो तेंव्हा ८ वाजून गेले होते आणि दोन्ही गड बघून होतील याची शक्यता वाटत नव्हती. मूळात गड बघणे हा ह्या बाइक ट्रिपचा मुख्य उद्देश नसल्याने तशी चिंता ...