Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
वर्षानुवर्षे शेअरींग करून लोक राहत आहेतच. खरे तर कुटुंबपद्धती म्हणजेही शेअरींगच आहे. नवरा-बायको यांनी शेअरींग केले म्हणूनच तर पुढे निर्माण झालेल्या सगळ्यांना शेअरींग म्हणजे काय आणि ते कसे करावे, करतच राहावे हे कळले. कधी आवडून तर कधी अंगवळणी पडलेय म्हणून तर अनेकदा नाईलाज म्हणून..... अगदी लहान बाळं म्हणजे वर्षासव्वावर्षाची झाली की त्यांना एखादी वस्तू, गोळ्या-चॉकलेट दिले की आई म्हणा बाबा कोणीतरी हात पुढे करून तिच वस्तू परत त्याच्याकडे मागते. क्वचित कधी बाळ देते पण बहुतेक वेळा हात मागेच घेते. म्हणजेच एक प्रकारे ह्या छोट्याश्या गमतीच्या कृतीतून ...