राजेनामा येथे हे वाचायला मिळाले:

कोल्हापूरहून रात्री बोरीवलीच्या गाडीत बसलो. सोबत आई,बाबा आणि शेजारच्या एक काकू ज्यांच्या नातेवाईकांकडे आम्ही उतरणार होतो.
पहाटे साडे पाच वाजता गाडी पार्ल्याला थांबली. तिथे सारं सामान उतरवून घेतलं आणि रिक्षा करून त्या नातेवाईकांकडे गेलो. दिवसभर विश्रांती घेतली. संध्याकाळी साधारण साडे पाच वाजता अचानक लक्षात आलं की आपल्या पाठीची सॅक जिच्यात एक फ़ाईल होती जिच्यात आयुष्यभराचे सारे ओरिजिनल सर्टिफ़िकेट्स होते ती आपण कुठेतरी विसरलो आहोत.
पायाखालची जमीन/वाळू/कार्पेट वगैरे सगळं सरकलं.
पोटात गोळा नंबर १.
शांतपणे विचार केल्यावर आठवलं की ...
पुढे वाचा. : डॉलरच्या देशा - भाग एक