रीतिभूतकाळाचे अकर्मक धातूंसाठी प्रत्यय आहेतः एकवचनी प्रथम आणि तृतीय पुरुषांसाठी 'ए' आणि द्वितीय पुरुषासाठी 'स'. अनेकवचनी प्रत्यय तिन्ही पुरुषांसाठी अनुक्रमे ऊ/ओ, आं, आणि त.
अस, पड, चढ, बस, जड हे अकर्मक धातू आहेत. त्यांची रूपे अशीः मी/तो/ती असे/पडे/चढे/बसे/जडे. आम्ही असू/असो वगैरे.
तू असस इत्यादी. तुम्ही (करत) असां. आणि ते असत/पडत/चढत/बसत/जडत.
पाडणे जडवणे, घडवणे हे सकर्मक धातू आहेत. त्यांची प्रथम पुरुषी आणि तृतीय पुरुषी रूपे: पाडी, जडवी, घडवी वगैरे.
त्यामुळे जीव जडे हेच बरोबर. (जडी चूक! )
पहाः
तुका म्हणे माझ्या जीवा । तुकाराम
स्नेह करी हृष्ट करी तर्पी रक्षी सदैव सन्मानी । मोरोपंत
उतरे चढेहि वर्षे गर्जे पाडी घनांधकारातें । परशुरामतात्या गोडबोले.