एएसएपी हे संक्षिप्त रूप फार जुने नसावे. डिक्शनरी डॉट कॉम वरही त्याचा जन्मकाळ १९९०-१९९५ (म्हणजे आंतरजालाच्या जन्मा-प्रसाराबरोबरच? ) दाखवलेला आहे. (त्यापूर्वी 'तारेत' लिहीत होते की नाही माहीत नाही. ) त्यामुळे आंतरजालावर इंग्रजीतून व्यवहार करणाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना हा लगोलग माहीत झालेला नसावा.

शक्यता आहे.

तरीही, आजमितीस कार्यालयीन निरोपांत (निदान अमेरिकेत तरी) हा शब्द सर्रास वापरला जातो. त्यामुळे, तसेच दूरचित्रवाणी मालिका वगैरेंतून होणाऱ्या प्रसारातून वगैरे, निदान आजच्या घडीला तरी हा शब्द निदान अमेरिकेत तरी बहुतेकांना माहीत असावा. (किमानपक्षी कार्यालयीन नोकरी करणाऱ्या, तसेच क्वचित्प्रसंगी मीटिंगांना उपस्थित राहावे लागणाऱ्या, प्रत्येकाला तरी निश्चितच माहीत असावा.)