तापल्या मातीस वाटे, लांबला पाऊस यंदा
पावसाला काळजी, अद्याप ती सुस्नात नाही
आजही घडतात भेटी, आजही फुलतात गात्रे
भाग सवयीचाच जादा, अंतरी बरसात नही
वा! दोन्ही शेर आवडले.
( दरखास्त अथवा मखमली प्रणिपात यापैकी काहीही खटकलेले नाही.. ते जसे आणि ज्याकरता आले आहेत त्यात खटकण्याचे काही कारण मला तरी सापडले नाही. शेवटी संस्कृत शब्द घेतले तरी आरडाओरडा, इंग्रजी घेतले तर अमूकच झाले.. अरबी , फारसी शब्द घेतले तर उगीच काफिये भरती... प्रत्येक रचनेत दोष शोधायचा म्हटला तर शोधता येतोच. कविता वाचतांना अंतरी बरसात असावी लागते ...फक्त जरा वेगळी इतकेचः)
किंबहुना पहिला शेर, दरखास्त , बरसात आणि प्रणिपात हे सगळेच शेर अतिशय बारीक निरीक्षण , संवेदनशीलता यातून आलेले आहेत. मला आवडले.
शुभेच्छा
सोनाली