खटकाखटकीचे कारण नक्कीच आहे. आणि ते कारण म्हणजे अवास्तव/अवाजवी मराठीकरण (साध्यासोप्या शब्दांसाठी क्लिष्ट तत्सम अथवा बिगर मराठी शब्दयोजना)विरुद्ध संयमित/पर्यायशून्य अमराठीकरण (बिगर मराठी शब्दयोजना - कारण ते शब्द मुळातच मराठी नसल्याने, त्यांना मान्यताप्राप्त, साधासोपा/सुलभ मराठी प्रतिशब्द नसल्याने) यांचा सारासार विचार हे आहे. या विचाराचे सर्वाधिकार कवी/कवयित्रीकडेच असणार आहेत; मात्र वाचक/आस्वादक आणि कवी/कवयित्री यांच्यात याबद्दल एकमत असेलच असे नाही. आणि तसे भिन्न मत नोंदवण्यासाठी प्रत्यवाय नसावा.

व्यक्तिशः - मला दरखास्त खटकले कारण त्यासाठी मान्यताप्राप्त, सुलभ मराठी प्रतिशब्द नक्कीच उपलब्ध आहे/त. हा शब्द काफिया म्हणून येणे हा वेगळा मुद्दा झाला. याआधी काही गझलांमध्ये मला 'साकी' वगैरे शब्दही खटकले आहेत. मला 'ओव्हन' शब्द खटकणार नाही, कारण त्याला सुलभ, मान्यताप्रापत, वापरला जाणारा मराठी प्रतिशब्द नाही.

व्यक्तिशः ++ मला मिलिंद फणसेंच्या शब्दयोजनेमागच्या विचारांबद्दल शंका नाही; पण दरखास्त च्या उपयोजनाबद्दल (काफिया म्हणून घेणे सोडून इतर काही कारण असल्यास) कुतूहल आहे इतकेच.