पाककृतीत सोयाबीन वापरण्याबद्दल काहीही म्हटलेले नसून सोयाबीनची वडी वापरण्याबद्दल म्हटले आहे.

सोयाबीनची वडी हा नेमका काय प्रकार आहे, ते कळत नाही, परंतु बहुधा सोयाबीनमधील प्रथिनांपासून बनवलेला तोफूसारखा काही प्रकार असावा, अशी शंका येते. तसे असल्यास वास येण्याचे बहुधा काही कारण नसावे. उलटपक्षी ज्या कोणत्या रश्श्यात शिजवावे, त्या रश्श्याचा वास आणि स्वाद यावा, अशी शंका आहे.

किंबहुना भारतातही सोयाप्रथिनांपासून बनवलेली ('न्यूट्रि-नगेटस'सारखी - नाव नक्की आठवत नाही; चूभूद्याघ्या! ) अशी अनेक उत्पादने बऱ्याच काळापासून मिळतात असे वाटते. कोंबडीसाठी बनवण्याच्या (किंवा इतर कोणत्याही मांसाहारी पाककृतीसाठी बनवण्याच्या) रश्श्यात शिजवून, शुद्ध शाकाहारी 'नकली कोंबडीचा रस्सा' किंवा इतर तत्सम शुद्ध शाकाहारी 'नकली मांसाहारी' पदार्थ बनवण्यासाठी अशा उत्पादनांचा सर्रास वापर होतो असे ऐकले आहे. (स्वतः असे 'नकली मांसाहारी' पदार्थ बनवण्याची किंवा खाण्याची गरज न भासल्यामुळे प्रयोग केलेले नाहीत, त्यामुळे या ऐकीव माहितीच्या खरेखोटेपणाबद्दल किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या खाद्यपदार्थाच्या दर्जाबद्दल कोणत्याही प्रकारची ग्वाही देऊ इच्छीत नाही. केवळ एक ऐकीव आणि पडताळून न पाहिलेली माहिती एवढेच महत्त्व या माहितीला द्यावे.)