काही मते आधीपासून मांडत आलो आहे.
 
१) विडंबन ही कवीवरील वैयक्तिक टीका नसावी.

२) विडंबनातून हसू जरूर यायला पाहिजे, पण ते हसू सर्वांना येऊ शकले पाहिजे. त्यासाठीच विडंबनात असे विषय यावेत की जे त्या त्या काळचे ज्वलंत / सामाजिक / टीका करण्यायोग्य / विचित्रतेने युक्त असे विषय आहेत. ( उदाहरणार्थः एखादा लहान मुलगा खोदलेल्या बोअर मध्ये पडणे हे वारंवार होत आहे. त्या बाबीचे, त्यावर माध्यमांनी दाखवलेल्या अपरिपक्वतेचे विडंबन व्हायला हवे. )

३) विडंबनात कधीही बीभत्स वर्णन नसावे. कुणाची ढेरी वाढली, कुणी दारू प्यायली वगैरे! ( यात काहींना हसू निश्चीतच येणार, पण तो विनोद दर्जेदार तर नाहीच,
उलट तो मूळ कवी अगदी सहज करू शकतो पण करत नाही. )

याद्रुष्टीने  मी मनोगतावर वाचलेले एकही विडंबन हे विडंबन नाही.