आपली कविता वाचून मायबोलीच्या हितगुज दिवाळी ०५ अंकात प्रकाशित झालेली माझी कविता आठवली (नसती तरच नवल)
:- ओली संध्याकाळ -:
नजर झुकलेली
ओठ मिटलेले
निर्व्याज भावनांना
कोंब फुटलेले
चिंब ओलेती
लाजुनी उभी
वीज कशास्तव
चमकते नभी
हातात माझ्या
थरथरता हात
सप्तपदी चालती
दिवस अन रात
अंगभर श्रावण
लक्ष जलधारा
पदराशी झोंबतो
प्रणयातुर वारा
ओढ विलक्षण
दोन जिवांची
बोल बोलते
भाषा स्पर्शांची
नवेच तेज
माझ्या डोळ्यांत
उजळणे तुझे
माझ्या सोहळ्यात
मेघ पांगले
निरभ्र आकाश
मंद हालचाली
आश्वस्त बाहुपाश
पुन्हा भेटायचे
वचन आसवांचे
तृष्णा वाढविती
ओघळ पावसाचे !!
योगायोगच म्हणायचा .. दुसरं काय
पुढील लेखनासाठी शुभेच्छा