प्रश्न आपल्याला खटकले किंवा नाही याचा नाही.
भटांच्या बाराखडीत काफियाची जी व्याख्या केलेली आहे त्यानुसार 'दरखास्त' हा काफिया या रचनेमध्ये चालू शकत नाही.
( मागे असेच एकदा 'वर्चस्व' व 'महत्व' असे मतल्यातील कवाफी होते. )
कवीला वेगळा पायंडा पाडायचा असेल तर त्यातून साहित्यासाठी खूप मोठे असे काहीतरी निघायला पाहिजे व तसे कवीने 'असे शब्द' वापरताना नमुदही केले पाहिजे.
'दरखास्त बसत नाही' या माझ्या विधानात माझ्या 'नसलेल्या' संवेदनशीलतेचा किंवा 'अंतरात नसलेल्या बरसातीचा' संबंध नसून नियमांचा आहे.
बाकीः या रचनेबद्दल म्हणाल तर 'अंतरी बरसात नाही' हा एकच शेर गजलेचा आहे.
अशा रचनांना सपाट रचना असे म्हणतात.