सरपटणारे विनोद : विनोदाच्या नवीन प्रकाराचे हे नामाभिधान मजेशीर वाटले. वाचतांना हसू आवरत नव्हते.

यावरून मला आणखी एक गोष्ट आठवली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत प्रचलित असलेल्या एका वृत्तपत्राला एकमेकींशी काही संबंध नसलेल्या घटनांबद्दलच्या बातम्यांच्या हेडलाईन्स, मध्ये आडवी रेघ (डॅश) टाकून छापण्याची संवय होती. महायुद्धादरम्यान एकदा हिटलर व त्याच्या साथीदारांची पीछेहाट झाली. हिटलरने त्याचे खापर मुसोलिनीवर फोडले. त्याच सुमारास इंग्लंडची राजकन्या प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. सदर वृत्तपत्राने या दोन्ही बातम्यांच्या हेडलाइन्स एकत्र करून खालीलप्रमाणे छापल्या होत्या. 
Son Born to Princess - Mussolini Blamed. 

"क्षणाच्या सोबतीने" एक नवी दृष्टी दिली. यापुढे मीही काही सरपटणारे विनोद सापडतात का ते पाहणार आहे.