मी एक साधे विधान केले, दोघांनी आपल्या सोयीने अर्थ लावून स्पष्टीकरण दिले ..
भूषण ,'स्त' नियमानुसार चालणार नाही, हे पटते. पण गझल सपाट आहे हे विधान सुद्धा सगळ्यांना पटणारे असावे असे नाही. पण तसा प्रतिसाद तुम्हाला द्यावासा वाटला, तुम्ही दिला.
च्रकपाणि ,शब्दाच्या निवडीविषयीचा मुद्दा मला पटलेला नाही. फिर्याद, बरखास्त हे शब्द जर मराठीत रुळले आहेत तर मग इतर शब्दांकरता मुद्दाम असे का खटकावे? कवी त्याच्या माहितीचे, त्याला वापरायचे आहेत ते शब्द वापरतो. ते इतरांना पटले उत्तम , न पटले तरी काही हरकत नाही. शब्दाविषयी आणखी कोणीतरी मुद्दा काढलेला आहे. मखमली प्रणिपात बद्दल जयंता यांनी विचारणा केली आहे. प्रत्येकजण मत देण्यास स्वतंत्र आहेच.
ही एक विचारधारा किंवा गजल लेखनाची पद्धत म्हणून त्याकडे बघता येईल. आता उदाहरण म्हणून फणसे यांच्याच गझला घेतल्या तर असे वेगळे वाटणारे काफिये त्यात आढळतात. इतर भाषांमधून मराठीत रूळलेले शब्द , पौराणिक संदर्भ हे त्यांच्या गझलेचे वैशिष्ट्य सुद्धा मानता येईल.
माझ्या प्रतिसादात खटकले तर सांगायचे नाही असा सूर कोठेही नाही. इथे प्रकाशित का करायचे ते वाचकांचे मत बघण्याकरता हे तर गृहित धरलेलेच आहे.
प्रतिसादांवर नेमके उत्तर फणसेच देऊ शकतील गझल त्यांची आहे:)
गैरसमज नसावा.
सोनाली