सोनालीताई,

आपण स्वतः गजलकार असूनही आपल्याला तो शब्द 'काफिया' म्हणून न खटकता 'इंग्रजी, संस्कृत, उर्दू, फार्सी वर आरडाओरडा होतो' म्हणून माझे मत खटकले होते. ( मी भाषेच्या बाबतीत बोललोही नव्हतो.)

मी आपल्या 'मला तरी काही खटकले नाही' चा हा अर्थ घेतला.

हा अर्थ नसेल तर काय अर्थ होता हे कृपया सांगावेत.

( आणखीन एक - शाहिस्तेखान या नावाने वावरणाऱ्या एका व्यक्तीने एक महान विचार मांडला आहे. 'दरखास्त' वृत्तातच बसत नाही असा तो विचार! 'दरखास्त' हा शब्द व्रुत्तात बसतो. तो या रचनेत 'काफिया' म्हणून बसत नाही.

ही रचना 'सपाट' आहे असे मत मी का मांडले हे स्वतंत्र प्रतिसादात लिहीत आहे.

धन्यवाद!