प्रकार वाटतो, आपले लिखाण वाचल्यानंतर!
ही एक अति असुरक्षिततेची भावना असावी.
उदाः कुत्रे चावले तर पुर्वी पोटात काहीतरी १४ वगैरे इंजेक्शने घ्यावी लागायची. तयवेळेस जर एखाद्या मुलाला सांगीतले की 'असे असे असते' तर तो कुत्रा पाहताच घाबरू लागेल. भले ते कुत्र्याचे लहान पिल्लू असो. ( अर्थात, म्रुत्यू निश्चीतच येतो तसे कुत्रा चावेलच असे नाही, त्यामुळे हे उदाहरण खूप योग्य अजिबात नाही. ) फक्त, काहीतरी साधर्म्य म्हणून दिले.
माझ्यामते त्या निश्चीतपणे रिकाम्या असतील. म्हणजे, काहीही काम नाही, ध्येय नाही, ज्यात जगण्याची उर्मी वाढीस लागते अशा एकाही क्षेत्रात त्या नसाव्यात! तसे असल्यास त्यांना काही ना काही गोष्टींमध्ये गुंतवून ठेवावे लागेल.
त्यांना जर काही काम / रंजनाचे साधन असेल, तर वैद्यकीय तपासण्या करून 'सर्व काही ठीक आल्याचे' रिपोर्टस दाखवता येतील, ज्यायोगे त्यांचा आत्मविश्वास कदाचित पुन्हा निर्माण व्हावा.
एक उपाय खोटेपणाचा आहे पण उपयुक्त ठरावा असे वाटते. - त्यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी साधारणपणे 'अजून ३० वर्षे तरी काही होणार नाही' अशा काहीतरी स्वरुपाचा रिपोर्ट देणे ( देणे म्हणजे मिळवणे! )
किंवाः
एखाद्या ज्योतिषाकडून दीर्घायुष्याचे भविष्य वर्तवून घेणे! ( अर्थात, हे दोन्ही उपाय आपल्या योग्य वाटले तरच! )
मानसशास्त्रीय तज्ञाकडून सल्ला मिळतोच!
( आता शेवटचे व वैयक्तिक मत - जी काही परिस्थिती आपण कथित केली आहेत त्यावरून माझा असा अंदाज झालेला आहे की त्या एकाकी असाव्यात. याबाबतीत, आपण दोघांनी व इतर काही लोकांनी त्यांच्याशी सतत बोलत / त्यांचा शक्य त्या गोष्टीत समावेश करत राहिले पाहिजे असे वाटते. )
काही जास्त बोलले गेले असल्यास माफ करावेत.