च्रकपाणी , शब्दाच्या निवडीविषयीचा मुद्दा मला पटलेला नाही. फिर्याद, बरखास्त हे शब्द जर मराठीत रुळले आहेत तर मग इतर शब्दांकरता मुद्दाम असे का खटकावे? कवी त्याच्या माहितीचे, त्याला वापरायचे आहेत ते शब्द वापरतो. ते इतरांना पटले उत्तम, न पटले तरी काही हरकत नाही.
<चक्रपाणि>
मुद्दा हाच आहे. बरखास्त, फिर्याद रुळलेत तसा दरखास्त रुळलाय का? साकी रुळलाय का? महबूबा रुळलाय का? (मला नाही वाटत! ) नसेल तर चला सगळेच मिळवून रुळवू, काय हरकत आहे? ग्वाल्हेर, इंदूर, विदर्भ भागातील मराठी खास हिंदी बाज लेवून सजली आहे. तेथील मराठीला मान्य असलेले (? ), तेथील मराठीत रुळलेले शब्दही (जसे हमेशा, पेड इ. ) मराठी गझलेत येण्याची वेळ आली आहे, असे वाटते.
</चक्रपाणि>