तुम्ही बरोबर ओळखलत. त्यांना कुठलाही छंद नाही. एकाकीपण आहेच. तसं त्यांची बहीण भाऊ भारतात त्यांच्या अगदी जवळ राहतात. खूप नातेवाईक येऊन जाऊन असतात. पण त्यांना सारखं वाट्टं की हे सगळे माझ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून येतात. खरं तर सगळेजण सुस्थितीत आहेत आणि त्यांची खूप काळजी घेतात. आम्ही अगदी रोज भारतात फोन करायचा, इथेही जमेल तेवढं घरी रहायचा प्रयत्न करतोच पण शेवटी काम तर असतंच.

डॉक्टरांच्या खूप तपासण्या आणि काहीही झालं नाहीये हे कमीत कमी ३-४ डॉ. नी सांगून झालय.

ज्योतिषाचा उपाय मला आवडला. हे करून पाहिलं पाहिजे. आता कुणीतरी विश्वासू  ज्योतिषी शोधते...

माफी कसली मागता.. तुमच्या उत्तरासाठी खूप धन्यवाद...