जोडाक्षराच्या आधीचे अक्षर लघू असल्यास जोडाक्षराचा अर्धा भाग त्यात मिसळतो. इथे 'खा' हे गुरू अक्षर आहे.


उदा. 'बंदिस्त' शब्दात 'दि' लघू असल्यामुळे पुढचा अर्धा 'स' त्यात जातो आणि गा-गा-ल असे गण पडतात. त्यामुळे 'बंदिस्त नाही' अशी अक्षरे या रचनेत (वृत्तात) बसतात.
'दरखास्त' मध्ये गा-गा-गा असेच गण येतात. उच्चारतांनाही तो फरक जाणवतो.

अर्थात, ही फक्त माझी मते आहेत. (स्वयंघोषित सोडून इतर) तज्ञांनी आपली मते द्यावीत/मार्गदर्शन करावे.