भूषणजी, तुमच्यासारखा विचार माझ्याही मनात आला होता.
मानसशास्त्रातील मनोरेखनाचे (माइंड मॅपींग) तंत्र वापरून व्यक्तीची नेमकी मानसिकता जाणून घता येते. त्या आधारे काही उपाययोजना करता येईल. मला आणखी एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे मूळची जागा सोडून दुसरीकडे राहायला गेल्यामुळे तर असे होत नाही ना?
दुसरे असे की त्यांच्या या भीतीला काही विधायक वळण देता येईल का असा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. म्हणजे मरण तर येणारच आहे. मग मरणानंतरही नाव मागे राहील असे काही करून जावे. (थोडक्यात, मरावे परी... ) ज्या योगे त्या गुंतून राहतील. म्हणजे मरणाचा विचार मनात येण्यासाठीचा मानसिक रिकामेपणा राहणार नाही.
अवांतर : तुमचा ज्योतिषाचा सल्ला आवडला. मला नेमका पत्ता आठवत नाही, पण पूर्वी मी एका संकेतस्थळावर जन्म तारीख, वजन वगैरे माहितीच्या आधारे मृत्यूची अंदाजे तारीख शोधून देणारा उद्योग पाहिला होता.( त्यांच्या संशोधनाप्रमाणे मी २०४८...)