काहीसा असाच एक खेळ आम्ही खेळतो. त्याचं नांव आहे 'जर-तर'. खेळात भाग घेणारांचे २ गट करावयाचे. एका गटाने 'जर' ने सुरू होणारी वाक्य लिहायची दुसरा गट 'तर' ने सुरू होणारी वाक्य लिहील आणि मग या चिठ्ठ्यांचे क्रमाने वाचन करावयाचे. म्हणजे प्रथम 'जर' ने सुरू होणारी चिठ्ठी वाचायची व लगेच त्याला जोडून 'तर' च्या चिठ्ठ्या वाचणारा चिठ्ठी वाचेल या प्रमाणे वाचन करताना खूप धमाल करणारी वाक्य निर्माण होतात. जेवढ्या चिठ्ठ्या जास्त तेव्हढी धमाल भरपूर. या खेळाला आणखी काही नांव आहे का?