वरीलप्रमाणे संक्षेपाने गोंधळ उडणार असेल तर तो वापरण्याचा आग्रह कशासाठी ? मोठ्या लिखाणात  त्याच त्याच मोठ्या शब्दसमूहाची पुनरावृत्ती करणे आवश्यक असेल तर त्यावेळी पहिल्यांदा केलेल्या उल्लेखाशेजारी कंसात संक्षिप्त रूप वापरून नंतर तो संक्षेप पुढील लिखाणात वापरणे योग्य ठरेल, पण एक ओळीचा संदेश किंवा मागणी नोंदवताना संक्षेप वापरून गोंधळ उडवण्यापेक्षा सरळ मूळ शब्दसमूह वापरणे श्रेयस्कर नव्हे का ? संक्षेप वापरण्यामुळे वाचणाऱ्या वेळापेक्षा उडणाऱ्या गोंधळामुळे वाया जाणारा वेळ कदाचित जास्त असेल.यात कोणावरही दोषारोप करण्याचा हेतू नाही.