एका किंवा अनेक शब्दांनी बनलेल्या एखाद्या नावाचे किंवा विशेषणादिकाचे वा वाक्यांशाचे लघुरूप करण्याचे इंग्रजीत तीन प्रकार आहेत.  संक्षेप(ऍब्रीव्हिएशन), (आद्याक्षरज शब्द)ऍक्रॉनिम आणि आद्याक्षरमात्र(इनिशियॅलिझम).  पहिल्या प्रकारात मूळ शब्दात असलेली (किंवा नसलेली) अक्षरे घेऊन एक शब्द तयार करतात. यांत अक्षरे कॅपिटल किंवा स्मॉल किवा दोन्ही असू शकतील. मिस्टर, डॉलर यांची लघुरूपे या प्रकारात मोडतात.  अक्रोनिममध्ये आद्याक्षरे आणि मूळ शब्दांतली काही अन्य अक्षरे घेऊन एक उच्चार करता येईल असा शब्द बनतो.  ऍसॅप, रेडार  ही या प्रकाराची उदाहरणे.  आद्याक्षरमात्र या प्रकारात प्रत्येक आद्याक्षर स्वतंत्रपणे उच्चारावे लागते. जसे, पी एल ओ, यू एस ए वगैरे.  आधीच्या प्रतिसादांत आलेली संकेतस्थळे जरी नावांनी भिन्न असली तरी त्यांवर ही तिन्ही प्रकारची लघुरूपे आहेत. आपल्या एखाद्या विशिष्ट मुळाक्षराने सुरू होणारी सर्व लघुरूपे एकत्र पहायची असतील, acronyms.com हे स्थळ तितकेसे उपयोगी नाही.