नुकताच साईटवर जाऊन आलो.
१) हे व्यावसायिक संकेतस्थळ असल्याकारणाने अजून थोडा कॉर्पोरेट वाटेल असा लुक आवश्यक.
२) त्यासाठी होमपेजवर तरी निदान आपला व्यवसाय/म्युच्युअल फंडाशी संबंधित माहितीशिवाय बाकी माहिती असू नये. उदा. वापरलेला फाँट, आपला फोटो/प्रोफाइल...
३) हिरवा पार्श्वरंग नकोसा होतो (वैयक्तिक मत)
४) टि. एफ. एस. च्या लोगोच्या बाजूला निसर्गचित्रांच्या कोलाजाचं प्रयोजन कळलं नाही!
५) बारिकसारीक शुद्धलेखनाच्या चुका टाळाव्यात. तशा त्या फार नाहीतही. मनोगताच्या शुद्धलेखन चिकित्सा सेवेची मदत घेता येईल.


संपूर्णपणे मराठीत असे संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.