गुंजारव येथे हे वाचायला मिळाले:

कधीकधी अचानक खुळीसारखी थांबते मी जागीच. डोळे दूरच्या वाटेकडे, अंगभर रोमांच, जिभेवर मधगोडवा.. कानांत घुमणारी हाक, आणि मग तो वेडावणारा गंध. श्रावणातला मृद्गंधराज आणि अंगणात पानागणिक तटतटून फुलणा-या रातराणीचा वास - माझे जीव की प्राण! .. पण तू आलास आणि ते दोन्ही विसरून गेले रे. कसा आत आत भिनत गेलायस माझ्या! रूप-स्पर्श-रस-शब्दांतून त्या अनामिक गंधाकडे जाणं - जणू तारसप्तकातल्या गंधारापर्यंत चढणारी सुरेल तान.

तुझं रूप, माझ्या मारव्यातला कोमल ऋषभ .. ...
पुढे वाचा. : मालवगंध