!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
पुण्यातुन निघताना मन बैचेन होते.जीवाची होणारी घालमेल कशी आणि कोणाला सांगावी हे कळतच नव्हते.डोळे भरुन आलेले.मैत्रिणीला promise केलेले की रडणार नाही आणि अश्रु आलेच तर बाहेर पडु देणार नाही त्याच शर्थीने अश्रु डोळ्याबाहेर पडू नयेत ह्याची खबरदारी घेत विमानात बसले.असे होणे स्वाभाविकच होते.माझेच काय प्रत्येक आईचे असेच होत असेल.मुलाला नविन Collage त प्रवेश मिळाला होता.त्याची सगळी होस्टेल ची व्यवस्था लावुन देऊन मी माघारी जात होती.प्रचंड दडपण होते..मनात खुप शंका,कुशंका होत्या.विचारांचे काहुर माजले होते.कसा राहील एकटा.स्वत:कडे लक्ष देइल न..का ...