शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:

चौक १
ज्यांची त्रैलोकीं कीर्ति गाजती । जो दक्षिणाधीपती ॥
शिवाजी छत्रपती । रणांत ज्यानें गाजविली तलवार ।
तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्ली मिळणार ॥ध्रु०॥
महाड संस्थानांतिल छोटे । गांव ऊमराठे ।
कोंकण तें मोठें । डोंगराळ देश जंगल चोरवाट ।
मावळे लोकांची वस्ती आटोकाट । वनश्री रम्य दिसे आफाट ॥
त्या खेडयांतील राहाणार । तानाजी वीर ।
मराठा शूर । शिवाजिशी त्याची मैत्रि असे दाट ।
लहानपणापासून फक्त दुजे ताट । अशापरि त्यांनी जुळविला घाट ॥
अशा परिवारात तानाजी । दिसे रणगाजी ।
उमेद नित्य ताजी । ...
पुढे वाचा. : नरवीर तानाजी मालुसरे (पोवाडा) - शाहीर माहित नाही .