आपली मते चुकीची आहेत.

 शक्य असल्यास आपले दोन्ही प्रतिसाद रद्द करावेत किंवा एक स्वतंत्र प्रतिसाद देऊन 'माझा हा प्रतिसाद नजरचुकीने दिला गेला' हे स्पष्ट करावेत.

आपले म्हणणे तसेच राहिले तर शक्यता आहे की काही लोक मात्रा तशाच मोजायला लागतील.

त्यात आणखीन एक गोष्ट आहे. शाहिस्तेखान या नावाने वावरणारी मूळ व्यक्ती प्रत्यक्षात कुणी तज्ञ आहे किंवा नाही हे लोकांना माहीतच नसल्यामुळे लोक चुकीच्या मात्रा मान्य करतील.

दरखास्तमध्ये काहीही मात्रा दोष नाही.

स्त मधील 'स' चा भार 'खा' वर पडत आहे. त्यामुळे 'खा'च्या दोन मात्रा आहेत त्या दोनच राहात आहेत. मराठीमध्ये तीन मात्रा किंवा अडीच मात्रा असे काहीही नाही. त्यामुळे त्या ओळीच्या २९ मात्रा होऊ शकत नाहीत.


(विषयांतर व/वा व्यक्तिगत संदर्भ/रोख वाटलेला मजकूर वगळला : प्रशासक)