तुझा संग नाही नशीबी- नसू दे
तुझ्या फक्त ध्यासातही मौज आहे !

 -छान.

सतीश,
तुम्ही ही रचना 'कविता' ह्या लेखनप्रकारात टाकली आहे, तिला गझल म्हटलेले नाही.मात्र कविता म्हणून ती विस्कळीत वाटते, एकसंध वाटत नाही. २,३, व ५ ह्या द्विपदींचा १, ४ शी सकृतदर्शनी फारसा संबंध दिसत नाही.
ही कविता असल्यास शेवटी दिलेल्या 'स्फूट' द्विपदीचे प्रयोजन काय? ती कवितेत अंतर्भूत करण्याच्या आड काय आले? असे वाटते की दुसऱ्या शेरात काफिया व अलामत वेगळ्या आल्यामुळे हिला गझल न म्हणता कविता म्हटले आहे. ह्यावर उपाय ह्या शेराचे पुनर्लेखन हे होते असे सुचवावेसे वाटते. सध्या परिस्थिती , हेही आणि तेही नाही, अशी झाली आहे.
प्रामाणिक मत मांडले आहे, राग नसावा. पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या.