-श्री. देवदत्त,

छानच विषय आहे. ह्याविषयातल मलाही जास्त काही माहित नाही, पण वाचत-वाचता एक प्रश्न पडला. 

कधी-कधी, काही चेहेरे पाहिले की ती व्यक्ति अचानक आवडते / आपलीशी वाटते , तर काही चेहेरे फ़ारच परके वाटतात. ह्याचा संबंधही अंतर्मन - बहिर्मन ह्याच्याशी आहे का ? म्हणजे, पुर्वायुश्यात, ज्यांच्याकडुन आपल्याला चांगले अनुभव आले त्यांच्या चेहेऱ्यांची बांधणी ( structure / outline ) आपले बहिर्मन, आपल्याच अंतर्मनाच्या "चांगले" ह्या कप्यात तर, ज्यांच्याकडुन वाईट अनुभव आलेत ते चेहेरे / व्यक्ति, अंतर्मनाच्या "वाईट" ह्या कप्यात नोदणी करते. जेव्हा आपण एखादी नवीन व्यक्ति पहातो, तेव्हा आपले बहिर्मन, त्या व्यक्तिच्या चेहेऱ्यची सांगड अंतर्मनात आधीच नोंदणी झालेल्या चेहेऱ्याच्या बांधणीशी करते, आणि तो चेहेरा कुठल्या कप्यात आहे, त्यावरुन नवीन व्यक्तिबद्दल मत तयार करते.

आपल्या पहिल्या उदाहरणात, आई-वडीलांचे शब्द / वाक्य, मुलाचे बहिर्मन, अंतर्मनातील कोणत्या कप्यात संग्रहीत करते ह्यावर, पुढिल आयुश्यात, मुलगा अश्या स्थितीला कसे सामोरे जातो हे अवलंबून आहे. ह्यागोष्टिची सांगड दुसऱ्या उदाहरणाशी घालणे जरा कठिणच आहे. हे आपलं माझ मत आहे, जाणकारांनी कृपया अधिक माहीती द्यावी.

माझे एक मित्र योग-अभ्यासक आहेत. त्यांच्यामते, ह्यागोष्टी मागे, कंपनशास्त्र असुन, प्रत्येक  व्यक्तीला स्वतःची अशी एक frequency असते आणि दोन व्यक्ति जेव्हा एकमेकांसमोर येतात, तेव्हा आपले/परके ही भावना, ती frequency match होते किंवा नाही ह्यावर अवलंबुन असते. बऱ्याचदा समोरासमोर न येताही ही कंपने आपल्या पर्यंत पोचतात. उदाहरण म्हणजे, chatting. काही लोकांशी बोलायला आपल्यला आवडते, काहीना मात्र आपण विनाकारण टाळतो. अशी ही कंपने फ़क्त व्यक्तिंनाच नाहीत तर, प्राणी, झाडे इ. पासुन, वस्तु व स्थळांनाही असते. उदाहरण म्हणजे, मंदिरात गेलंकी प्रसंन्न वाटते, काहीच्या घरात गेलंकी आवडतं, काही घरात मात्र थोड अस्वस्थ वाटते. ह्याला, ती वस्त्तु ( वास्तु ) आणि तिथे राहणारे, येणारे-जाणारे ह्यांचे एकत्रीत कंपन जवाबदार आहे.

आपल्या पहिल्या उदाहरणात, जेव्हा आई-वडील चर्चा करतात, तेव्हा, दोघांमधुन एकत्रित कंपने बाहेर पडतात, व झोपेत, तो मुलगा ती कंपने ग्रहण करतो. जर का ही एकत्रित कंपने सकारत्मक असतील तर मुलावर त्याचा परिणामही सकारत्मक असाच होईल. आणि जरका ती नकारत्मक असतील तर मुलावर त्याचा नकारत्मक परिणाम होईल. कोटाबाबतीतही तेच, प्रेयसीला एखादी वस्तु हावी आहे, हे प्रियकराला, ती कंपनेच साग़तात, व विकत घेताना काय घ्यायचे हे ही तेच ठरवतात. ( प्रेम खरं आहे, आणि दोघांची कंपने जुळतात हे इथे गृहित धरलेलं आहे ! )

खरं-खोट काय ते मला नाही माहित, पहिला प्रकार शास्त्रिय कसोट्यांमध्ये बसणारा आहे असे वाटते, तर दुसऱ्याला तर्कसंगत शास्त्रिय प्रमाण मिळणे कठिणच. असो. अधिक चर्चा होऊन जेव्हा इतर लोकं आपापली मते मांडतील तेव्हा ह्या गोष्टिवर थोडाफ़ार प्रकाश पडेल असे वाटते. विषय मात्र छान आहे !

मयुरेश वैद्य.